।। ओ३म् ।।
नमः ऋषिभ्यः पथिकृद्भ्यः ।
मानवतेचा मार्ग दर्शविणाऱ्या महान ऋषींना सादर नमन !
(ऋग्वेद १०/१४/१५)
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या मार्गदर्शनाखाली, आर्य समाज औराद (ता. उमरगा) व पूज्य गुरुजींच्या समस्त शिष्यवृंदांच्या वतीने आर्य जगताचे तपोनिष्ठ संन्यासी, असंख्य विद्यार्थ्यांना वैदिक मानवतेची शिकवण देणारे, समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी जीवन अर्पण करणारे थोर आर्य समाजसेवक आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व
स्मृतिशेष पूज्य स्वामी श्रद्धानंद सरस्वतीजी (हरिश्चंद्र गुरुजी) यांच्या
प्रथम पुण्यस्मृती समारंभ व
महापुरुष प्रशंसन स्मृती यज्ञ
( निज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी रविवार, दिनांक १२ जुलै २०२६)
📍 स्थळ :
आर्य समाज मंदिर, औराद, ता. उमरगा, जि. धाराशिव
सश्रद्ध निमंत्रण
मान्यवर महोदय / महोदया,
शुभ नमस्ते !
आपणास सविनय कळविण्यात येते की, हजारो विद्यार्थ्यांना वेदप्रतिपादित मानवतेची शिकवण देऊन राष्ट्राचे आदर्श नागरिक घडविणारे, अखंड ब्रह्मचारी, तपस्वी संन्यासी, समाज व राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे, हैदराबाद व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हिंदी रक्षा व गोहत्याबंदी आंदोलनातील सत्याग्रही, जातिप्रथा निर्मूलनासाठी कार्य करणारे कृतिशील समाजसुधारक, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे आधारस्तंभ आणि औराद गावचे भूमिपुत्र
स्मृतिशेष पूज्यपाद स्वामी श्रद्धानंद सरस्वतीजी (हरिश्चंद्र गुरुजी)
यांचा प्रथम पुण्यस्मृती समारंभ रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या मार्गदर्शनाखाली, आर्य समाज औराद व पूज्य गुरुजींच्या शिष्यवृंदांच्या वतीने खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समारंभाची रूपरेषा
सकाळी ९.३० ते ११.००
महापुरुष प्रशंसन स्मृती यज्ञ व प्रवचन
यज्ञाचे ब्रह्मा :
- पं. राजवीरजी शास्त्री
(वैदिक विद्वान, सोलापूर) - पं. प्रियदत्तजी शास्त्री
(वैदिक विद्वान, हैदराबाद) - आचार्य सत्येंद्रजी
(प्रधानाचार्य, गुरुकुल आश्रम, परळी)
सकाळी ११.०० ते १२.३०
पूज्य स्वामी श्रद्धानंदजी (गुरुजी) पुण्यस्मृती श्रद्धांजली समारंभ
अध्यक्ष :
- स्वामी विद्यानंद सरस्वतीजी
(प्रधान, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा)
प्रमुख पाहुणे :
- मा. डॉ. श्री हनुमंतराव कराड
(डायरेक्टर, मेडिकल कॉलेज समूह, एम.आय.टी., लातूर) - मा. डॉ. डी. पी. नवलकेले
(संशोधक शास्त्रज्ञ, मुंबई) - मा. डॉ. विठ्ठलराव लहाने
(प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, लातूर) - मा. डॉ. बी. एम. मेहेत्रे
(प्रसिद्ध वैज्ञानिक, हैदराबाद) - मा. डॉ. मधुसूदन काळे
(प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ, परळी वैजनाथ)
स्मृती प्रसाद भोज
कार्यक्रमानंतर तत्काळ आयोजित करण्यात येईल.
तरी सर्वांनी या पुण्यस्मृती समारंभास उपस्थित राहून पूज्य स्वामी श्रद्धानंदजी (गुरुजींना) भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, ही नम्र विनंती.
विनीत
- बळीराम सूर्यवंशी — प्रधान
- राजेंद्र पाटील — मंत्री
- सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते -आर्य समाज, औराद (ता. उमरगा, जि. धाराशिव)
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा
- लखमशी वेलानी — कार्यकारी प्रधान
- प्रा. अर्जुनराव सोमवंशी — मंत्री
- रंगनाथ तिवार — कोषाध्यक्ष
- सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच पूज्य गुरुजींचे समस्त शिष्यवृंद
टीप :
औराद हे उमरगा चौऱस्ता ते आळंद रोडवर, औराद पाटीपासून सुमारे २ कि.मी. अंतरावर स्थित आहे.
🎶🎵मधुर भजन सुनने के लिए यहाँ क्लिक करे 👇🎵🎶




















