आर्य समाज पश्चिम विभाग न्यास राम नगर, औसा रोड, लातूर
श्रावणी वेदप्रचार सप्ताह
मंगळवार, दि. २७ ऑगस्ट ते रविवार, दि. १ सप्टेंबर, २०२४ (श्रावण कृ. ९ ते श्रावण कृ. १४ शके १९४६)
सस्नेह निमंत्रण
आर्य समाजाचे दहा सुवर्ण सिद्धांत
१. सर्व सत्य विद्या आणि जे पदार्थ विद्येने जाणले जातात, त्या सर्वांचे आदी मूळ परमेश्वर आहे.
२. ईश्वर सच्चिदानंदस्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादी, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र आणि सृष्टिकर्ता आहे. त्याचीच उपासना करणे योग्य आहे
३. वेद सर्व सत्य विद्यांचे पुस्तक आहे. वेद शिकणे-शिकविणे आणि ऐकणे-ऐकविणे हा सर्व आर्यांचा परम धर्म आहे.
४. सत्याचा स्वीकार करण्यास आणि असत्याचा त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे.
५. सर्व कामे धर्मानुसार अर्थात सत्य आणि असत्याचा विचार करून करावीत.
६. सर्वांची शारीरिक, आत्मिक आणि सामाजिक उन्नती करून अखिल विश्वावर उपकार करणे हा या समाजाचा मुख्य उद्देश आहे.
७. सर्वांशी प्रेमपूर्वक धर्मानुसार यथायोग्य वर्तन केले पाहिजे.
८. अविद्येचा नाश आणि विद्येची वृद्धी केली पाहिजे.
९. प्रत्येकाने आपल्याच उन्नतीत संतुष्ट न राहता, सर्वांच्याच उन्नतीमध्ये आपली उन्नती समजली पाहिजे.
१०. सर्व मानवांनी सामाजिक सर्वहितकारी नियम पाळण्यामध्ये परतंत्र असले पाहिजे व व्याक्तिगत हिताचे नियम पाळण्यात सर्वांनी स्वतंत्र असावे.
मान्यवर उपदेशक विद्वान
उपदेशक – पं. ज्ञानप्रकाशजी शास्त्री, वैदिक व्याख्याता बलिया (उत्तर प्रदेश)
भजनोपदेशक – पं. भूपेंद्रसिंहजी आर्य, आर्य भजनोपदेशक अलिगढ़ (उत्तर प्रदेश)
दैनंदिन कार्यक्रम
सकाळी : ०७-३० ते ०८-१५ यज्ञ
०८-१५ ते ०९-१५ भजनोपदेश
०९-१५ ते १०-१५ प्रवचन
१०-३० ते ११.३० भोजन
रात्रि : ०८-०० ते ०९-०० भजनोपदेश
०९-०० ते १०-०० प्रवचन

विशेष कार्यक्रम
रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी
- आर्यसमाज रामनगरच्या सदस्य परिवारातील इयत्ता १० वी
व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
- मान्यवर विद्वानांचा व अन्य मान्यवर व्यक्तींचा सत्कार.
- सत्कार समारंभानंतर लगेच ऋषिलंगर (महाप्रसाद).
(महाप्रसाद डॉ. सौ. सुनिता पाटील, गुरुमाऊली हॉस्पिटल, राजीव गांधी चौक, लातूर यांच्या सौजन्याने)
सस्नेह आवाहन
सर्व धर्मप्रेमी नागरिकांना कळविण्यास आनंद होतो की, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, परळी वैजनाथ अंतर्गत आर्यसमाज रामनगरचे मानव जीवन कल्याण श्रावणी वेदप्रचाराचे कार्यक्रम दि. २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत साजरे होत आहेत.
या काळात सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या यज्ञ, भजन व प्रवचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक व आरोग्यविषयक विषयांचे विवेचन विद्वानांद्वारे केले जाणार आहे. वैदिक विचारधारा ही मानवाला निर्व्यसनी, सदाचारी, चारित्र्यवान, आरोग्यसंपन्न, विद्वान व आदर्श नागरिक बनविणारी अर्थात माणसाला माणूस बनविणारी आहे. अंधश्रद्धामुक्त व जातिविरहित समाजनिर्मितीसाठी आर्य समाज ही संस्था कार्यरत आहे.
तरी अधिकाधिक नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, ही विनंती.










