राज्यस्तरीय विद्यालयीन निबंध स्पर्धा – २०२४
निबंध स्वीकारण्याचा अंतिम दिवस दि.३१ डिसेंबर २०२४
विषय :- महर्षी दयानंदांचे सामाजिक विचार
प्रिय विद्यार्थ्यांनो !
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा विद्यार्थ्यांमध्ये शुद्ध वैदिक तत्त्वज्ञान, मानवीय मूल्ये, सामाजिक जाणिव व राष्ट्रप्रेम रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचा विकास व्हावा, या पवित्र उद्देशाने सभेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीं “सौ. तारादेवी व प्रा. जयनारायण मुंदडा (अ.नगर) यांच्या गौरवार्थ राज्यस्तरीय विद्यालयीन निबंध स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.
१९ व्या शतकातील थोर समाजसुधारक व वैदिक क्रांतीचे अध्वर्यू महर्षी दयानंद सरस्वती यांनी सामाजिक सुधारणा चडून यावी यासाठी प्रभावी विचार मांडले. विशुद्ध वेदज्ञानाध्या आधारे त्यांनी समाजातील अंधश्रद्धा व रुढी-परंपरा यांना मूठमाती देत खऱ्या अर्थाने सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशातील समाज हा विविध मत- संप्रदाय व जातीभेदांनी पोखरलेला आहे. कालबाह्य विचारांमुळे समाजात धार्मिक थोतांड वाढीस लागले आहे. स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार, दलितांचे शोषण, शेतकऱ्यांची पिळवणूक, अनेक रुढी-परंपरांमुळे समाजात दुःखाचे वातावरण पसरले आहे. यावर स्वामी दयानंदांनी वेदज्ञानाच्या आधारे शाश्वत विचार मांडले. आपल्या ‘सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथात वर्णव्यवस्थेचे आदर्श स्वरूप कथन केले. समाज सुधारणेत अडसर ठरणाऱ्या अज्ञान, अविद्या, अन्याय, अभाव या शत्रुचा नायनाट करण्याचा सृष्टिव्यवस्थेला अनुसरून मानवतावादी दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवला. त्याद्वारे समाज सुखी, शांत व आनंदी बनू शकेल. विद्याथ्यांनी या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करावे, या उद्देशाने या निबंध स्पर्धेसाठी वरील विषय ठेवण्यात आला आहे. तरी विद्याथ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे.
-: स्पर्धेचे नियम व अटी :-
१) या स्पर्धेत केवळ ८ वी, ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भाग घेता येईल.
२) प्रत्येक विद्यालय व आर्य समाज संस्थेतर्फे अधिकाधिक निबंध पाठवावेत. सोबत विद्यालयाचे संमतीपत्र असावे.
३) फुलस्केप कागदाच्या एकाच बाजूवर मराठी किंवा हिंदी भाषेतून विद्यार्थ्यांनी निबंध लिहावेत.
४) निबंध टंकलिखित किंवा संगणकीकृत असू नयेत.
५) स्पर्धकांनी स्वतःच्या सुवाच्य हत्ताक्षरात लिहिलेल्या निबंधाची शब्दमर्यादा १५०० इतकी असावी.
६) स्पर्धकांव्यतिरिक्त इतर कोणीही निबंध लिहून पाठविल्याचे आढळल्यास ते निबंध रद्द होतील.
७) परीक्षधांचा निर्णय सर्वांसाठी नकारक अंतिम राहील.
- पारितोषिके :- रु.२१००/- (प्रथम), रु.१५००/- (द्वितीय), रु.१००० (तृतीय) विजेत्या स्पर्धकांना वैदिक साहित्य व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.
स्वामी विद्यानंद (प्रधान), लखमसी वेलानी (का. प्रधान), प्रा. अर्जुनराव सोमवंशी (मंत्री), रंगनाथ तिवार (कोषाध्यक्ष) व पदाधिकारी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, आर्य समाज, परळी वैजनाथ जि.बीड
- स्पर्धा संयोजक
भागवतराव आघाव (७७९८५२१०६२), पं. लक्ष्मणराव आर्य-गुरुजी (९४२०२६९९२४),
निबंध पाठविण्याचा पत्ता संयोजक, सौ.व. श्री मुंदडा राज्य विद्यालयीन निबंध स्पर्धा-२०२४, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, आर्य समाज, परळी वैजनाथ-४३१५१५ जि.बीड










